वाळूज एमआयडीसीतून आठ जणी सैराट; तरूणींसह विवाहिताही बेपत्ता

Foto
वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : वाळूज एमआयडीसी परिसरातून तरूणी आणि विवाहित महिला बेपत्ता होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या महिन्याच्या तीन आठवड्यात आठजणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी एमआयडीसी वाळूज ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यात पाच मुली व तीन विवाहितेंचा समावेश असून, शोध न लागल्याने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पहिली घटना, वर्षा सुभाष आल्हाट (१८) रा. जोगेश्वरी ही बुधवारी (दि.१०) सकाळी १० वाजेच्या सुमारास कॉलेजला जाते असे म्हणून घरातून निघून गेली. सायंकाळ झाली तरी घरी न आल्याने कुटूंबियांनी आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. दुसऱ्या घटनेत, रोशनी सुरेंद्र तिवारी (१९) रा. रांजणगाव ही शुक्रवारी (दि.१२) सकाळी घरी कोणी नसल्याची संधी साधून निघून गेली. घरी न आल्याने तिचा आजूबाजूला नातेवाईकांकडे मुळ गाव बिहार येथे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तिसऱ्या घटनेत, शुभांगी एकनाथ यादव (२३) रा. घनसांगवी (ता. जालना) ही मिटमिटा येथील फॉर्मसी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेते. दरम्यान, शनिवारी (दि. १३) दुपारी २ वाजेच्या सुमारास तिने लग्न केले असून बजाजनगरमध्ये असल्याचे वडीलांना फोन करून सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी बजाजनगर येथे येऊन शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

चौथ्या घटनेत लक्ष्मी बबन वाहुळे (२०) रा. वरूड जालना ही मुलासह तीन दिवसांपूर्वी बजाजनगर येथे भावाकडे आली होती. रविवारी (दि.१४) ती कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. भावाने मुळ गावी विचारपूस केली असता तेथे नसल्याचे सांगितले. म्हणून तिचा नातेवाईकांकडे आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. पाचव्या घटनेत आकांक्षा प्रशांत भैरवार (२३) रा. रावते मंगल कार्यालय रांजणगाव ही विवाहिता रविवारी (दि.२१) पती कंपनीत पगार आणण्यासाठी गेल्याची संधी पाहून घरातून निघून गेली. पती पुन्हा घरी आला त्यावेळी ती न दिसल्याने आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आली नाही. 

सहाव्या घटनेत विवाहिता सिमरन समीर पठाण (२५) रा. कमल गॅस एजन्सी रांजणगाव ही सोमवारी (दि.२२) सकाळी १० वाजेच्या सुमारास कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. पतीसह कुटूंबियांनी नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. सातव्या घटनेत पुजा ज्ञानेश्वर बुधवंत (२४) रा. रांजणगाव शे.पुं. रविवारी २१ डिसेंबर रोजी कोणालाही काही न सांगता निघून गेली. आठव्या घटनेत भाग्यश्री रामदास इंगळे (१९) रा. रांजणगाव, दत्तनगर ही ८ डिसेंबर रोजी कॉलेजला जाते म्हणून घरातून निघून गेली. ती परत आलीच नाही. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोह रेखा चांदे करत आहे.